सुरुवात ...
या काव्यामद्धे मी "सुरुवात" या गोष्टीचा काव्यात्मक अर्थ मंडला आहे.
MARATHI POETRY
उमेदीने उमलणाऱ्या कळीप्रमाणे
त्या स्वानंदी फुलाप्रमाणे
हे माणसा स्वतःच्या आयुष्याची
सुरुवात कर मनाप्रमाणे.
सिद्ध करण्याची संधी देते
परिश्रम आणि त्रासही घेऊन येते
त्यावर मात करण्याचे मनाशी पक्क कर
हे मानसा पुन्हा सुरुवात कर.
सूर्याप्रमाणे तेजस्वितेने कर
भरभरून प्रोत्साहन स्वतःला कर
घडवण्याचे नियोजन मनाशी कर
पण सुरुवात करण्या वाटचाल कर.
सुरुवात कर जिंकण्यासाठी
अमूल्य त्या आनंदासाठी
स्वतःला सिद्ध करण्याकरता
सुरुवात कर स्वतःसाठी.
