पाठीशी कृष्ण हवा …
श्री कृष्ण....
MARATHI POETRY


पाठीशी कृष्ण हवा
सर्व दु:ख घेऊन जायला
त्याचीच साथ हवी पुन्हा
नाविण्याने सुख द्यायला.
सदैव कृष्ण सोबत राहावा
कधी मित्र तर कधी गुरु म्हणून
वाटते आयुष्य जगावे
कृष्णाच्याच नामावरून.
कृष्ण मनी कृष्ण ध्यानी
रहावा म्हणून भक्ति करतो
कृष्ण हा जीवनाचा
सर्वश्रेष्ठ मार्गदर्शक ठरतो.
शेवटी त्याचीच गीता
जगाला पुरून उरते
त्याची गीता वाचून
जीवन हे सार्थक ठरते.
