पावलांना अंत नाही
या कवितेत मी जीवनातील न संपणारा संघर्ष काव्यात्मक स्वरूपाणे मांडला आहे.
MARATHI POETRY


पावलांना अंत नाही
थांबण्यास उसंत नाही
आतुरलेली नजर ही
अंतिम ठिकाण पाही.
थांबणे हा धर्म नाही
अडखळणे पसंत नाही
जीवनाच्या वाटेवर
प्रवासात जीवन जाई.
प्रवाशाला थकणे नाही
मागे वळून बघणे नाही
चालताना जमिनीवर
शिखरावरती नजर राही.
नजर ही अंधुक नाही
डोळ्यांशिवाय मार्ग नाही
थांबले जरी पावले
थांबत नाही काही.
