तूच कृष्णा..
कृष्णा..
MARATHI POETRY


सारथी तूच हवा
मला या जिवनी
जरी अर्जुन नसलो
तरी तूच आहेस मनी.
रहा ना सदैव सोबती
होऊन माझा सखा
सांगेन तुला सर्व
तू नाहीस रे नवा.
भक्ति तुझी करतो
जसं कळलय जग मला
उपदेश तुझा हवा
नवीन अर्जुन राहणार उभा.
नको सर्व जग
फक्त तू सोबती पाहिजे
एकमेव आहेस असा तू
की मला तू पाहिजे.