तूच कृष्णा …

सारथी तूच हवा मला या जीवनी जरी अर्जुन नसलो तरी तूच आहेस मनी. रहा ना सदैव सोबती होऊन माझा सखा सांगेन तुला सर्व तू नाहीस रे नवा. भक्ती तुझी करतो जसं कळलय जग मला उपदेश तुझा हवा नवीन अर्जुन राहणार उभा. नको सर्व जग फक्त तूच सोबती पाहिजे एकमेव आहेस असा तू की मला तू पाहिजे. By Om Pimple.

प्रत्येक रचनेतील…

प्रत्येक रचनेतीलतू माझा अभंग आहेसओवी लिहितो तुझ्या स्मरणातमी संत तू पांडुरंग आहेस. मी मोगरा तू सहवास आहेमी दिवस तू रात्र आहेजरी संपलो सरण्याआधीफक्त तुझ्यासाठी जगणार आहे. चित्र मी तू रंग आहेचंद्र मी तू शीतलता आहेजरी घडलो आईवडिलांमुळेतरी ही तुझी साथ आहे. मी खोल समृद्रतू आकाश निळाशार आहेसमी पुस्तक अध्यात्माचेतू गीतेचा सार आहेस.