तू आणि मी ...
तू आणि मी...
MARATHI POETRY
रातराणी सम तू
मी त्यातला सुगंध
मी पुसट आठवणी
तू त्यातला रंग.
मी निर्मळ आरसा
तू त्यातल प्रतिबिंब
मी पाण्याचा झरा
तू थेंब पावसाचा चिंब.
मी निळे आकाश
तू ढग पांढराशुभ्र
मी काळ जूना
तू नवीन युगाचा पर्व.
मी शब्द नव काव्याचा
तू कविता निरागस
मी पुस्तक कवितेचं
तू त्यावर मुखपृष्ठ अलगद.
