शिवछत्रपती ...
या कवितेमद्धे मी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तुत्वाचे लेखन केले आहे.
MARATHI POETRY
रयतेची साथ
मावळ्यांचा हात
आईची शिकवण
आणि भवाणीचा आशीर्वाद.
मातीशी नातं
विश्वासाचे वचन
स्वराज्याचे स्वप्न
आणि मनाचा निर्धार.
प्राणांची आहुती
लढण्याचा ध्यास
बलिदान हाच श्वास
आणि राजांचा सहवास.
असुरांवर मात
अवगुणांचा नाश
सुविचारांची पेरणी
आणि जिंकण्याचा नाद.
बलाढ्य ते बळ
कणखर मन
ताठ मानेने जगणे
आणि आदराचा दृष्टिकोन.
