प्रत्येक रचनेतील ...
या कवितेत मी काव्य रचना काव्यात्मक स्वरूपाने मांडली आहे.
MARATHI POETRY
प्रत्येक रचनेतील
तू माझा अभंग आहेस
ओवी लिहितो तुझ्या स्मरणात
मी संत तू पांडुरंग आहेस.
मी मोगरा तू सहवास आहेस
मी दिवस तू रात्र आहेस
जरी संपलो सरण्याआधी
फक्त तुझ्यासाठी जगणार आहे.
चित्र मी तू रंग आहेस
चंद्र मी तू शितलता आहेस
जरी घडलो आईवडिलांमुळे
तरी तुझी साथ आहे.
मी खोल समुद्र
तू आकाश निळाशार आहेस
मी पुस्तक आध्यात्माचे
तू गीतेचा सार आहेस.
