मी ही झालो असतो ...
प्रकृतीच्या चार मूलभूत तत्त्वांशी – आकाश, पाणी, हवा आणि माती – एकरूप होण्याची माझी तीव्र इच्छा व्यक्त करणारी ही कविता आहे. आकाशाप्रमाणे विस्तीर्ण व असीम, पाण्याप्रमाणे प्रवाही व बाष्पात रूपांतरित होणारे, हवाप्रमाणे गतिशील व बंधनमुक्त, आणि मातीप्रमाणे शांत व सहनशील – अशी रूपे घेऊन कवी स्वतःला हरवून टाकण्याचे स्वप्न बघतो. हे जीवनाच्या मर्यादांपासून मुक्त होण्याचे, प्रकृतीत विलीन होण्याचे भावनिक चित्रण आहे.
MARATHI POETRY
Om Pimple
4/18/20261 min read
आभाळा एवढ विस्तीर्ण
मी ही झालो असतो
अंत नाही त्याला
मी हरवून गेलो असतो.
पाण्याइतके प्रवाही
मी ही झालो असतो
वाफ होते त्याची
मी बाष्प झालो असतो.
हवे इतके गतिशील
मी ही झालो असतो
बंधन नाही त्याला
मी सैराट झालो असतो.
माती इतके शांत
मी ही झालो असतो
तुडवून गेले कोणी
तर पाण्यात मिसळलो असतो.
Inspiration
Explore captivating articles and heartfelt poetry here.
Creativity
Expression
© 2025. All rights reserved.
