कृष्ण सखा...
मराठी स्वरचित कविता...
MARATHI POETRY


नको लाखोंची गर्दी
सोबत तुझा हात पाहिजे
कृष्णासम मानतो तुला
तुझ्या मनाची साद पाहिजे.
तुच होऊनी बसतोस
पाठराखा माझा
असतोस सोबती म्हणून
तूच कृष्ण माझा.
अंतरीचा भाव माझा
जरा रखशील का ?
होऊनी गुरु माझा
दर्शन घडवशील का ?
सुरुवातीचा प्रहर तू
सुरेख ती मंद रात्र
आठवतो ज्याला मी
तो आहे कृष्णा मात्र.
