एक संघर्ष स्वतःशी कर.

कविता जी आयुष्यातील संघर्ष आणि त्या संबंधीचे कर्तव्याची जाणीव करून देते.

MARATHI POETRY

Om Pimple

4/16/20261 min read

a man climbing a rock
a man climbing a rock

आयुष्य एक संघर्ष आहे
तो नियमानेच जग
अतिपणाचे क्रूर विचार
हे मानवा दूर सोड.

अधर्माचा क्षणात नाश
अध्ययुगी ही झाला
क्षणात होते काहीही
जरा मर्म ठेऊन जग.

बुद्धी जरा योग्य
आणि कर्तव्य पूर्ण कर
वेळेची मर्यादा आहे
हे विश्वाशी कबूल कर.

रंग आणि बेरंग
या बाजू एकाच नाण्याच्या
स्वतःचे आयुष्य कसे घडवायचे
हे स्वतःशी निश्चित कर.