अबोल वाट...

स्वरचित मराठी कविता.

MARATHI POETRY

Om Pimple

3/2/20261 min read

A car drives down a misty forest road.
A car drives down a misty forest road.

शांत आहे आता मी
आरडाओरडा ही थांबला
अबोल वाटेचा तो
रस्ता मात्र राहीला.

तुझ्या नसण्याने विरह होतोय
मात्र मातीशी साथ आहे कायम
जन्मभर दगडधोंडयाशी साथ राहीन
हे वचन राहीन माझे कायम.

रम्य पहाटे सूर्यकिरणांशी
रंगत जमते माझी छान
त्या वाऱ्याच्या मंद लहरीने
पहाट माझी उजळते छान.

पायाचे ठसे शोधत आहे
विरह मात्र तुझा भासतो
या झाडांवेली सोबत
दिवसागणिक दिवस जातोय.